शेतकरी मित्र केंद्र

Activities

गोआधारित नैसर्गिक शेती काळाची गरज-कार्यशाळा

Workshop Photographs

०१ जून २०२० रोजी महाविद्यालयात शेतकरी मित्र केंद्राची स्थापना झाली आहे.तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, येवती चे सचिव आदरणीय अॅड.मिलिंद पाटील साहेब,डॉ.अभय शहापूरकर,श्री.शेषाद्री डांगे,आणि श्री. विनायक हेगाणा यांच्या पुढाकारातून शेतकरी मित्र केंद्र सुरु करण्यात आले आहे. शिवार फौंडेशन व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मित्र केंद्र महाविद्यालयात कार्यरत आहे.या केंद्राच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाईन सेवा (८९५५७७१११५ ) सुरु करण्यात आली आहे.या हेल्पलाईन चा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.पीकविमा,शेतरस्ते,बँक सेवा,बी-बियाणे, शेती व औजारे इ .संदर्भात हेल्पलाईन च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत.या विभागात महाविद्यालयाच्या वतीने श्री.रवींद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख श्री.अशोक गोरे हे या विभागाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.मागील संपूर्ण वर्ष हे कोरोना ने प्रभावित असले तरी या विभागाचे काम अविरत चालू आहे.शेतकरी मित्र केंद्राचे काम विस्तारित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संपूर्ण जिल्ह्यात सहकार्य घेण्याची योजना आहे.ह्या अनुषंगाने डॉ. बा.आ.म.वि.औरंगाबाद विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुकूल आहे.

शेतकरी मित्र केंद्र अहवाल २०२०-२१ View Document

  • तालुक्यानुसार फोन कॉल ची संख्या
उस्मानाबाद ७४२ उमरगा २८०
कळंब २३५ वाशी ११२
भूम १०४ परंडा ४४
तुळजापूर २८६ लोहारा १०९

 

  • बाहेरील जिल्ह्यातून फोन   ( २०९ फोन )
सोलापूर ६३ बीड ३१ लातुर २० औरंगाबाद १०
जळगाव ०९ सांगली ०७ सातारा ०७ अमरावती ०७
यवतमाळ ०६ पुणे ०६ नगर ०५ हिंगोली ०५
परभणी ०५ नांदेड ०५ जालना ०४ नाशिक ०४
कोल्हापूर ०४ बुलढाणा ०२ मुंबई ०२ वाशीम ०२
नागपूर ०२ चंद्रपूर ०१ रायगड ०१ सिंधुदुर्ग ०१

 

  • बाहेरील राज्यातून फोन * ( १२ फोन )
    कर्नाटक ०५ हरियाना ०७

 

शिवार हेल्पलाइनला संपर्क केलेल्या शेतकऱ्यांपैकी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आत्महत्येचे विचार, तणावग्रस्त, त्रस्त शेतकरी संख्या – (१३४)

तीव्र ३५ मध्यम ९४ सौम्य ०५
           

 

  • फोनचे सर्वसामान्य वर्गीकरण –
    शेतरस्ता वाद ४८८ शेती व योजना ४७३ पीकविमा ३५३
    कर्जमाफी १७९ हेल्पलाईन बद्दल माहिती १०६ बियाणे चौकशी व नोंदणी ८७
    पीककर्ज ५२ बियाणे उगवले नाही २४ हवामान अंदाज २४
    महावितरण अडचण १६ पी.एम.किसान १५ शासकीय अनुदान अडचण १३
    बँक संबंधी अडचण १३ बाजारभाव व मार्केट १२ शैक्षणिक मदत विषयी ११
    शासकीय अधिकारी अडचण ११ नुकसान भरपाई ०९ रोजगार पाहिजे ०८
    कौटुंबिक वाद ०७ रेशन संबंधी ०७ रानडुकराचा त्रास ०७
    परीक्षा शुल्क माफी ०७ खताचे भाव विचारणे ०५ ऊसबील ०४
    होमलोन ०३ खात्यातून पैसे गेले ०३ गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ०३
    व्यापाऱ्यांकडून फसवणूक ०३ बियाणे टंचाई ०३ कोरोणा बद्दल माहिती ०३
    आरोग्य शिबिर  माहिती ०२ सावकारकडून  फसवणूक ०२ शेती वाहून गेली ०२
    वीज पडून पशु मृत्यू ०२ लाईट बिल जास्त ०१ शासकीय दाखला न मिळणे ०१
    जमीन फसवणूक ०१ शेतमाल चोरीला गेला ०१ आधार कार्ड अडचण ०१
    तलाव दुरुस्त तक्रार ०१ प्रश्न सुटला हे सांगणे ०१ विधवा महिला पेन्शन ०१
    शेतमाल पेटवून दिला ०१ किसान क्रेडिट कार्ड ०१ पंचायतराज व्यवस्था माहिती ०१
    रोहयो बिल अडकले ०१ जमीन मावेजा ०१ नवीन मतदान नोंदणी ०१
    माहितीचा अधिकार कसा वापरावा ०१ भावकी भांडण ०१ माती परीक्षण ०१

 

Gallary

News