Event No.10: 26 Nov 2024 व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय धाराशिव संविधान अमृत महोत्सव 2024 निमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
Event No.9: 30 Oct 2024 स्व.प्रमोदजी महाजन यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
Event No.8: 29 Oct 2024 राष्ट्रीय सेवा योजना संचनालय नवी दिल्ली यांच्यामार्फत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय प्री रिपब्लिक डे परेडसाठी येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचा विद्यार्थी धनंजय दिलीप देशमुख याची निवड करण्यात आली आहे. दिनांक 12 नोव्हेंबर 2024 ते 21 नोव्हेंबर 2024 या दरम्यान होणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे होणाऱ्या शिबिरामध्ये तो सहभागी होणार आहे.
Event No. 7: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात संपन्न झाल्या.
Event No. 6: महाविद्यालायीन तरुणांनी मोबाईलचा अति वापर व व्यसनाधीनता या कडे न जाता स्वतः मधील कौशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे असे मत डॉ.गोरख मंद्रूपकर यांनी व्यक्त केले.
Event No. 5. 10th Oct 2024 जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत महाजन महाविद्यालयाचे घवघवीत यश धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित अविष्कार २०२४ या जिल्हास्तरीय स्पर्धेत येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत महाविद्यालयातील १८ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी ९ संघ हे विद्यापीठ स्तरावरील फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
Event No.4 मराठी विषयाच्या संशोधन केंद्र व आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रास मान्यता – या भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात मराठी या विषयाच्या संशोधन केंद्रास मान्यता दिल्याची घोषणा डॉ.गजानन सानप यांनी यावेळी केली. या संशोधन केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी विषयात संशोधन करणे सोपे होणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यावेळी व्यक्त केले.
Event No.3 व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात ग्रीन क्लब च्या वतीने श्रावणी उपाकर्म पर्वातील निर्माल्याची महाविद्यालयातील गांडूळ खत बेडमध्ये साठवण
Event No.2 व्यंकटेश महाजन महाविद्यालयात क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न धाराशिव – येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या
Event No.1 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा धाराशिव – येथील व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.