Welcome to Admission Portal of Venkatesh Mahajan Senior College, Dharashiv
राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंत्री लोढा म्हणाले की, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे.
या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे.राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्यक्षात १९५८ महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेत, ही बाब सकारात्मक आहे. ACKVKs १५-४५ वयोगटातील तरुणांना आधुनिक कृषी पद्धती, डिजिटल मार्केटिंग आणि गुणवत्ता नियंत्रण यासह विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देतात . या कार्यक्रमाचे उद्दिष्ट तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
Programme Details
Office Executive (MEP/Q0211)
Syllabus
Skill India
Sr. No | Content | Download |
1 | Office Executive | View/Download |
Contact Us
Dr. Laxman Chikhale
Head and Assistant Professor
Department of Physics
Venkatesh Mahajan Senior College, Dharashiv
Samarth Nagar, Sanja Road, Osmanabad – 413501